निलंगा येथे शिवसेना, युवती सेना मध्ये युवतींचे जाहीर प्रवेश
निलंगा- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवती सेना जिल्हाधिकारी ॲड श्रद्धा जवळगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथे पक्षवाढी साठी काही युवतीने युवती सेनेत प्रवेश केले. त्यात मुस्लिम युवतीचा ही प्रवेश झाला हिना सलीम सय्यद, अफसाना मुज्जावर,राधा गायकवाड,लक्ष्मी रुपणर, लत्ता कांबळे, फतरूबी पठाण ,मोमीन बेबुसहरा, सुनीता हुरगुट यांचा प्रवेश युवती सेने मध्ये घेण्यात आला.युवती सेना जिल्हाधिकारी अँड श्रद्धा जवळगेकर,युवती तालूकाधिकारी लातूर सूचित्रा साखरे,अर्चना ढाले,मेहेराजबी शेख या उपस्थित होत्या.