उस गाळपासाठी यंत्रणा वाढवावी वेळेवर उसाचे गाळप व्हावे यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आमदार अमितजी देशमुख यांनी केल्या सूचना
मांजरा, विलास, रेणाला गाळप वेळेवर करण्याच्या सूचना
लातूर -लातूर जिल्ह्यातील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना, विलास साखर कारखाना, रेणा साखर कारखाना यांनी उर्वरित चालु गळीप हंगामातील उसाची तोडणी वेळेवर करावी व यंत्रणा उभी करावी उसाचे गाळप वेळेवर करावे अशा सूचना राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, राज्याचे माजी वैधकीय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सूचना दिलेल्या आहेत
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवारातील सर्वच कारखान्याने चालु वर्षीचा गळीप हंगाम अधिक क्षमतेने चांगली तयारी केली असूनयासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज केली यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे पावसाचा खंड पडला होता ऊसाची वाढ झाली नाही एकरी कमी उत्पादकतेचा अंदाज होता मात्र नोव्हेंबर – डिसेंबर २०२३ नंतर परतीचा पाऊस पडला त्यामुळे उसाला फायदा झालाउसाचे एकरी उत्पादनही वाढलेले आहे पण या काळातही अवकाळी पावसामुळे काही काळ गळीत हंगामात व्यत्यय आला आहे सध्या हंगाम जलदगतीने सुरू आहे मात्र गाळप क्षमता जास्तीचे असूनही यासाठी अधिक यंत्रणा लागत असुन ही परिस्थिती पाहता या हंगामासाठी उर्वरित राहिलेल्या उसाची तोडणी वेळेवर करून उसाचे गाळप वेळेवर करावे व यंत्रणा वाढवावी अशा सूचना रवीवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी संबधित साखर कारखाना प्रशासनास दिल्या आहेत
————————–
मांजरा परिवारातील साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा आमदार धीरज देशमुख यांनी घेतला आढावा उर्वरित उसाचे गाळप वेळेवर होण्यासाठी यंत्रणा वाढवावी आमदार धीरज देशमुख यांनी केल्या सूचना
लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर, रेणा साखर,विलास साखर कारखान्यातील चालु गळीप हंगामातील ऊस गाळपाचा आढावा घेतला यावेळी बोलताना आमदार धीरजजी देशमुख यांनी जानेवारी महिना सुरू असुन पाण्याचे दुर्भिष्य, वाढते ऊन, यामुळें सभासद उस उत्पादक आपला उस लवकर गाळप व्हावा यासाठी मागणी करीत आहेत या अनुषंगाने आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सर्व साखर कारखान्याची चालु गळीप हंगामाची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी सर्व साखर कारखान्याना उर्वरित राहिलेल्या उसाची तोडणी वेळेवर करून उसाचे गाळप करण्यासाठीं अधिकची यंत्रणा उपलब्ध करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत .
|