• Sat. May 3rd, 2025

बाभळगावात वेळा अमावस्या उत्साहात

Byjantaadmin

Jan 12, 2024
बाभळगावात वेळा अमावस्या उत्साहात
माजी मंत्री आमदार अमित देशमुख, चेअरमन वैशालीताई देशमुख, आमदार धिरज देशमुख यांनी   शेतात  काळ्या आईची केली पुजा
लातूर : प्रतिनिधी कृषी संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळख असलेल्या दर्शवेळा अमावस्याच्या निमित्ताने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी वेळा अमावस्यानिमित्त बाभळगाव येथील शेतात जाऊन काळ्या आईचे पूजन व पांडव पूजन करुन सर्वांना वेळा अमावस्येच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांसोबत वनभोजनाचा आस्वादही घेतला. बाभळगाव येथे कृषी संस्कृतीशी निगडित सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ ही एक आगळी-वेगळी परंपरा विकासरत्न विलासराव देशमुख यांच्यापासून नेहमीच पाळली गेली आहे. दि.११ जानेवारी रोजी दुपारीदर्शवेळा अमावस्या साजरी करण्यात आली़ यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी  शेतीची,  देवी देवतांची  मनोभावे पूजा केली. सर्वांचे पालन पोषण करणाºया  निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त्त केली, त्यानंतर स्नेही, मित्रपरिवार, सहकारी यांच्यासह निसर्गाच्या सानिध्यात स्नेह भोजनाचा आनंद घेतला.  यावेळी  अभिजीत देशमुख, डॉ़ सौ. सारिकाताई देशमुख,  सत्यजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोइज शेख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  किरण जाधव, विलास को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, दिलीप माने, पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, प्रा. प्रवीण कांबळे, मनोज पाटील, राजकुमार पाटील, श्याम देशमुख, गोविंद देशमुख, बादल शेख, राजेसाहेब सवई, बालाजी वाघमारे, दगडूसाहेब पडीले, शेषराव हाके पाटील, सचिन मस्के,  विश्वनाथ कागले, प्रवीण माने, शिवाजी देशमुख, बळवंतराव पाटील, आनंद वैरागे, इसरार पठाण, एम. पी़ देशमुख, अब्दुल्ला शेख, करीम तांबोळी, पिराजी साठे, संदीप सूर्यवंशी, बालाजी कदम आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक
उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *