• Wed. May 7th, 2025

बॉलीवुड सुपरस्टार जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ येतोय ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

Byjantaadmin

Jan 12, 2024

बॉलीवुड सुपरस्टार जितेंद्र यांचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी‘ येतोय ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

 

मुंबई: बॉलीवुडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करून चंदेरी दुनियेत अधिराज्य गाजवणाऱ्या सुपरस्टार जितेंद्रने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. मराठी सिनेसृष्टित पदार्पण केलेला जितेंद्रचा पहिला मराठी चित्रपट ‘मोसंबी नारंगी’ रसिक प्रेक्षकांना १२ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर दाखविणारी निर्माती-अभिनेत्री म्हणजेच सुषमा शिरोमणी. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सना मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याचा मोह त्यांनी निर्माण केला. त्यांच्या अनेक मसालेदार सुपरहिट चित्रपटांपैकी असलेला दत्ता केशव दिग्दर्शित आणि बॉलिवूड सुपरस्टार जितेंद्र यांचे मराठीत पदार्पणकरणारा अभिनेते डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, यशवंत दत्त, अशोक सराफ, उषा चव्हाण आणि सुषमा शिरोमणी अभिनित ‘मोसंबी नारंगी’ हा आठवणीतला चित्रपट आता खास अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रसिकांना पहायला मिळणार आहे.

बैलांच्या शर्यतीत हरल्याने मंबाजी सुडेच्या भावनेने रघुजीच्या कुटुंबावर हल्ला करतो. जिथे रघुजीच्या दोन मुली मोसंबी आणि नारंगी विभक्त होतात, पत्नी मरण पावते आणि त्याची स्मरणशक्ती नष्ट होते. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा दोन्ही मुली रघुजीकडे परत येतात तेव्हा काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“आजकालच्या नवनवीन कंटेंटमध्ये आपल्या जुन्या आठवणीतील जूने चित्रपट कुठेतरी हरवले आहेत, म्हणूनच त्यांना पुन्हा अल्ट्रा झकासच्या माध्यमातून रसिकांना सादर करतानाचा आनंद गगनात न मावणारा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *