• Sat. May 3rd, 2025

माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते लातुर उच्चत्तम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

Byjantaadmin

Jan 12, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातुर उच्चत्तम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

सभापती उपसभापती यांच्यासह संचालक मंडळ  उपस्थित
लातूर ; लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ व अधिकारी यावेळी उपस्थित होते, शेतकरी तसेच कृषी उद्योगाशी निगडित व्यापारी व इतर सर्व घटक या सर्वांना ही दिनदर्शिका उपयुक्त ठरेल असा विश्वास लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीकडून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन गुरुवार दि-११ जानेवारी रोजी सायंकाळी बाभळगाव निवासस्थानी करण्यात आले .यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी लातुर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनिल पडीले, यांच्यासह संचालक आनंद पाटील, श्रीनिवास शेळके, लक्ष्मण पाटील, युवराज जाधव,पवन देशमुख, बळवंतराव पाटील,अनिल पाटील, बालाजी वाघमारे, बालासाहेब बिदादा,सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे,आनंद मालू यांच्यासह लातुर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *