अशोकराव पाटील मित्र मंडळ डोंगरगाव शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न
निलंगा- निलंगा तालुक्यातील डोंगरगाव येथे अशोकराव पाटील मित्र मंडळाचा उद्घाटन सोहळा अत्यंत मोठ्या उत्साहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा निलंगा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंडितराव भदरगे, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम, माजी जि.प.सदस्य सुरेंद्र धुमाळ, मा.समाज कल्याण सभापती रामभाऊ गायकवाड,काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील,डीसीसी बँकेचे निवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंदे,शिऊरचे दिनकर दाजी बिराजदार,चेअरमन विठ्ठल पाटील,नगरसेवक सुधीर लखन गावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.श्रीरंग दाताळ होते.यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,सध्या देशात व महाराष्ट्रात जातीयतेच्या नावाखाली व धर्माच्या नावाखाली मतासाठी राजकारण होत आहे.ते देशासाठी अत्यंत घातक असून आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात असून संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दाबून खासदाराला निलंबित करून पाचवी सत्तेच्या जोरावर अनेक कायदे पास करून अनेकांच्या जीवावर उठून बसले असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला संपण्याचा घाट घातला असून संविधान वाचवण्यासाठी आता आपण सर्वांनी वज्रमुठ बांधली पाहिजे.नाहीतर इंग्रजाच्या गुलामी पेक्षा बेकार परिस्थिती निर्माण होणार आहे. देशाच्या व महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी सत्तेमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे पुन्हा एकदा जिल्ह्याला काँग्रेसचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांची सरकार आणूया असे ते म्हणाले. यावेळी शेंदचे सरपंच रमेश मोगरगे,बुजरुगवाडीचे साहेबराव भोईबार,अजनीचे तानाजी निडवचे, वांजरवाड्याचे सरपंच लिंबराज सुरवसे,लिंबराज जाधव,कळमगावचे भरत शिंदे,राणी अंकुलगाचे वैशंपायन जागले,ढोबळेवाडीचे रमेश देशमुख, हलकीचे चेअरमन धोंडीराम ढोक, सत्यजित सूर्यवंशी,माजी सैनिक सोशल मीडिया निलंगा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,शि.अनंतपाळ सोशल मीडिया तालुकाध्यक्ष आदेश जरीपटके,मेहताब शेख,शामराव रकताटे, राजकुमार ब्राह्मणकर, धनराज कोळेकर गुरुजी,मित्र मंडळाचे शाखाध्यक्ष अमोल इंगोले, विशाल पाटील,अमर पाटील,प्रकाश गायकवाड,राजू काळे,निलेश सूर्यवंशी, राजू पवार,अजित पाटील, किरण पाटील,लिंबराज मोहिते,उत्तम काळे,श्रीराम काळे,भालचंद्र पाटील, यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी, गावातील जेष्ठ नागरिक तरुण युवक वर्ग व महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.