प्रलंबित शेतरस्ते कामे तातडीने मार्गी लावा आढाव बैठकीत आ.अभिमन्यू पवार यांच्या प्रशासनास सूचना
निलंगा -शेती विकासाच्या दृष्टीने शेतरस्ते हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.त्यामुळे माझ्या आमदार निधीसह विविध योजनेच्या माध्यमातून या कामांना भरीव निधी उपलब्ध करून दिला जात असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते हा विषय आपल्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून प्रलंबित रस्ते कामे तातडीने मार्गी लावा आशा सक्त सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या आहेत. निलंगा तहसील कार्यालयात (दि.८) जानेवारी रोजी आयोजित पालकमंत्री शेत /पाणंद रस्ते योजना समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,तहसीलदार उषाकिरण श्रंगारे ,गटविकास अधिकारी सोपान अकिले आदी उपस्थित होते,यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की शेतकऱ्यांना उत्तम शेती करता यावी त्याच्या जीवनात आर्थिक संपन्नता यावी यासाठी शेतरस्ते योजना हाती घेतली असून या कामासाठी संपूर्ण आमदार निधी दिला असून कोणत्याही गुत्तेदाराला आमदार निधी दिला नाही.ऐवढेच नाही तर नकाशावर रस्ता नसला तरीही संबधीत सर्व शेतकऱ्यांनी २० फुटाच्या शेतरस्ते कामासाठी बाॅन्डवर संमती दर्शविली तर त्या कामासाठीही निधी दिला जाईल. शेतरस्ते कामासाठी निधी कमी पडू देणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनाही या कामासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.मतदारसंघात निधी वाटप करताना तो राजकारण विरहित असून कोणीही विकास कामात राजकारण करु नये. सरपंचांनी आपल्या गावातील नकाशावरील शेतरस्ते मोकळे करून देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. विकासाच्या कामात अडथळा न करता सर्वानी एकत्र येऊन काम करावे असे सांगून ३३ फुटाचे शेतरस्त्याचे लवकरच डांबरीकरण करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. या आढाव बैठकीत पालकमंत्री शेत /पाणंद रस्ते योजना कामांचा आढावा त्यांनी घेतला.तसेच यावेळी पाणीटंचाईचा आढाव घेत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आशा गावातील ग्रामपंचायतीने त्याबाबचे अधिग्रहणसाठी प्रस्ताव सादर करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या याप्रसंगी सर्व खाते व विभाग प्रमुख उपस्थिती होते.
१ मे २०२४ पर्यंत एकही शेतरस्ता शिल्लक राहाणार नाही…
शेत तिथे रस्ता या अभियानातून जवळपास सत्तर टक्के शेतरस्ते कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रशासन तातडीने कामे करावी. १ मे २०२४ रोजी आपण मतदारसंघात एकही शेत रस्त्याचे काम शिल्लक राहिले नाही याची घोषणा करणार असून त्यापूर्वी हे कामे पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून या कामामुळे देशात औसा मतदारसंघाची ओळखही एकही अतिक्रमण मुक्त शेतरस्ते म्हणून होईल..
औसा बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली..
औसा तालुक्यात बाराशे किलो लांबीचे शेतरस्ते कामे पूर्ण झाली त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या वेळीत पेरणी व राशी झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल वेळीत बाजारात विकता आला एकंदरीत या सर्व गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना होत असून याचा सकारात्मक बाब म्हणजे औसा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढली असल्याचे आ.अभिमन्यू पवार यांनी सांगितले..