• Wed. Apr 30th, 2025

सशक्त, सक्षम समृद्ध भारताचा संकल्प युवा पूर्ण करेल – माजी खा. सुनिल गायकवाड 

Byjantaadmin

Jan 8, 2024
सशक्त, सक्षम समृद्ध भारताचा संकल्प युवा पूर्ण करेल – माजी खा. सुनिल गायकवाड
लातुर – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी  भारताला  महासत्तेचे स्वप्न दाखवले त्याकडे देशाची वाटचाल चालु असून युवा आज त्याच दिशेने अनेक तंत्रज्ञानासह औद्योगिक विकास करत आहे. पत्रकारिता हा समाजाला आरसा आहे तेव्हा पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ  असुन  वृत्तपत्राने राष्ट्रहीत समाजहित जोपासण्याचे काम करावे असे प्रतिपादन माजी खा. सुनिल गायकवाड  यांनी शासकीय विश्रामगृह येथे  सा. युवा मुस्लिम विकास परिषदच्या१७ व्या वर्धापन दिनानिमित्त  केले. निर्माण संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी सा. युवा मुस्लिम विकास संपादक अब्दुल समद शेख यांचा सत्कार व भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी लातुरच्या कु.विधी पळसापुरे यांना जाहीर झाला असून या सन्मानाबद्दल तिचा यथोचित गौरव करण्यात आला.
 यावेळी पुढे बोलताना  माजी खासदार आपल्या भाषणात  म्हणाले की सशक्त, सक्षम समृद्ध भारताचा संकल्प युवा पूर्ण करेल असे मनोगत व्यक्त केले.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी देशाच्या संसदेतील त्यांचे भाषण सबंध महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले  लातूरचे नाव देश पातळीवर पुन्हा एकदा गाजविलेली कु. विधी पळसापुरे यांनी यावेळी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सय्यद अझहर यांनी केले असून  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जमीयत उलेमा -ए हिंद जिल्हा अध्यक्ष मौलाना  इसराईल रशीदी व मराठवाडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक अध्यक्ष सत्यम गायकवाड  यांची  उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद  अखिल  यांनी केले तर आभार महेश  गाडेकर मानले. कार्यक्रम  यशस्वीतेसाठी कुरैशी तोफीक,  हाफे़ज शफीयोद्दीन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *