• Wed. Apr 30th, 2025

रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढणार? एकनाथ शिंदेंची गोची, महायुती काय निर्णय घेणार?

Byjantaadmin

Jan 8, 2024

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोबत बंड करून भाजपा सोबत वेगळी राजकीय चलू मंडळी तर खरी, मात्र आता येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अडचणी हळू हळू वाढत चाललेल्या आहेत. एककीकडे मावळचे खासदार श्रीरंग बारणेच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याचा बातम्या पुढे येत आहे. तर दुसरीकडे आता शिर्डीच्या जागेसाठी आरपीआय (RPI) गटाचे रामदास आठवले यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे युती सरकार मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होताना दिसत आहे.पुणे जिल्ह्याच्या भोर येथे त्यांचा दौरा होता. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा SC साठी राखीव आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी त्या जागेसाठी आग्रह धरला आहे. या पूर्वी २००९ मध्ये रामदास आठवले यांचा शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये सुद्धा भाऊसाहेब वाघचौरे हे युती सरकार मधून निवडून आले होते. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने सदाशिव लोखंडे याना उमेदवारी दिली होती आणि ते निवडून ही आले होते. २०१९ च्या निवडणूनकी नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, परंतुन एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपा सोबत सत्तेत सामील झाले आणि सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला. मात्र, आता केंद्रातल्या NDA घटक पक्षाच्या युती सरकार मधून शिंदेंच्या शिवसैनिकाला धोका आहे.रामदास आठवले यांनी म्हटले की, आगामी लोकसभेत महायुतीला राज्यात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील तर देशात ४०० पेक्षा जागा मिळतील असा विश्वास रामदास आठवलेंना आहे. राज्यामध्ये आरपीआयला जागावाटपामध्ये दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासोबत मी २०२६ पर्यंत आहे राज्यसभेमध्ये आहे, यापूर्वी काँग्रेस अलायन्स मध्ये असताना एका वेळेला मुंबई आणि दोन वेळेला पंढरपूरमध्ये असं तीन वेळा मी लोकसभेला निवडून आलो होतो. शिर्डीमध्ये मी एकदा हरलो होतो, त्यामुळं पुन्हा शिर्डीमधून लढण्याची माझी इच्छा आहे. पक्षाने संधी दिली तर मी त्या ठिकाणाहून लढेल. अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.रामदास आठवले यांचा मंत्री पदाचा कार्यकाळ हा २०२६ पर्यंत आहे. तरीही रामदास आठवले यांनी २०२४ मध्ये लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाहायला गेले तर शिर्डी लोकाभेची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. आगामी काळात ही शिंदे कडेच राहू शकते. मात्र असं असताना शिंदेना अडचणी वाढवण्यासाठी हा पेच असू शकतो का ? ज्या मावळ, शिरूर, आणि राज्यातल्या अन्य काही जागेंवर शिंदे यांच्या अडचणी वाढवण्यात येत असताना शिर्डीमध्ये सुद्धा असाच डाव मित्रा पक्षाचा असू शकतो का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *