• Wed. Apr 30th, 2025

ईडीचे अधिकारी चौकशीसाठी गेले अन् अख्खं गाव अंगावर आलं! ओढत नेत केली मारहाण

Byjantaadmin

Jan 5, 2024

ईडीच्या अधिकाऱ्यांवर मोठा हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील टीएमसी नेत्याच्या घरी पोहचलेल्या ईडीच्या पथकावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी टीएमसी नेते शाहजहान शेख आणि शंकर आध्या यांच्या घरी चौकशी करत होते. यावेळी घरासमोर मोठा जमावाने त्यांच्या वागनांवर हल्ला केला आणि त्यांच्यावर दगडफेक केली. EDचे पथक सकाळ ७ वाजून १० मिनिटांनी चौकशीसाठी शेख यांच्या घरी पोहचले. त्यावेळी घर आतून लॉक होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला.यावेळी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली. जमावाने नंतर संतप्त होऊन अधिकाऱ्यांवर हल्ला केला. अधिकार्‍यांना ओढत नेले आणि बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. कसेबसे ईडीचे अधिकारी जीव वाचवण्यासाठी पळून गेले.

ED अफसरों को घसीटकर पीटा, सिर फोड़ डाला; अस्पताल में कराना पड़ा एडमिट, TMC पर छापेमारी से बवाल

 

 

ईडी अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची ८ जणांची टीम घटनास्थळी दाखल होती. यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेमुळे राज्यपाल आनंद बोसही संतप्त झाले आहेत. दरम्यान, जखमी अधिकाऱ्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयाला याप्रकरणी प्राथमिक अहवाल पाठवण्यात आला आहे. ईडीच्या इतर पथकांनाही तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अधिकाऱ्यांवर तीन ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed