• Wed. Apr 30th, 2025

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आता बांबु टास्क फोर्स

Byjantaadmin

Jan 4, 2024
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आता बांबु टास्क फोर्स

मुंबई :राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देवून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे. २० जणांची ही समिती असून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांबू लागवडीचा वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स मध्ये, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवआणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सहअध्यक्ष असतील.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे या मंत्र्यांचा समावेश आहे.तसेच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, महसूल, वने, नगर विकास, ग्रामविकास, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, जलसंधारण, आदिवासी विकास, कृषी आणि पदुम विभागाच्या सचिवांचा देखील समावेश आहे. एकूण वीस सदस्य असलेल्या या टास्क फोर्स मध्ये रोजगार हमी आणि नियोजन विभागाचे प्रधान सचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटांना सामोरे लावं लागलं. बांबू हे पिक कमी पाणी वापरणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्यामुळे पर्यावरण स्नेही आहे. राज्यभरात बांबू लागवड केल्यास वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उदरनिवाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. या टास्कफोर्सची बैठक तीन महिन्यातून किमान एकदा होणार आहे.
टास्क फोर्सची स्थापना ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची मोठी घटना असून या निमित्ताने शाश्वत शेती विकासाचे पर्व सुरू होणार आहे. टास्क फोर्स गठीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मोठे प्रयत्न आहेत, असे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि टास्क फोर्स सदस्य पाशा पटेल यांनी सांगितले.येत्या 9 जानेवारी 2024 रोजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग  आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने  “शाश्वत पर्यावरण विकास” परिषद पार पडणार आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed