• Wed. Apr 30th, 2025

अनेक राज्यात भाजप बळकट नाही, तरी 450 जागा येणार कशावर म्हणतात? पवारांचा सवाल

Byjantaadmin

Jan 4, 2024

भाजपच्या  हातात सत्ता आहे. शिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्यावतीने सुरू आहे. सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आणि इतर राज्यात भाजप नाही, अथवा बळकट नाही. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. तरीदेखील 450 जागा जिंकणार हे कोणत्या आधारावर सांगत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरू आहे. या शिबिरात समारोपात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. पवार यांनी म्हटले की, मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीने सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले.

आपल्या भाषणात पवार यांनी म्हटले की, सातत्यानं सांगितलं जातं 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू परंतु भारताच्या दक्षिणेत आपण पहिलं तर भाजप त्या ठिकाणी भाजप नाही. काही राज्य असे आहेत जिथं भाजप आहे. मात्र, ते स्वत: च्या बळावर नाही. गोव्यात काँग्रेसच सरकार होत तिथं आमदार फोडण्यात आले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही असेही पवार यांनी म्हटले.

भाजपने फसवणूक केल्याचे लोकांना समजू लागले आहे

आपल्या हातात सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केल्या. मात्र, त्या पूर्ण केल्या नाहीत केवळ फसवणूक केली,आता हे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. एखाद्या धोरणाबाबत अशी मांडणी करतात की खासदार थक्क होऊन जातात असेही पवार यांनी म्हटले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले. मात्र, तसं झालं नाही. शहरी भागातील लोकांना घरे देऊ परंतु ते देखील झालं नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.

शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

संसदेत कही तरुण घुसले त्यांच्या हातात गॅस कांड्या होत्या. त्यांना पकडल गेलं त्याबाबतची माहिती खासदारांना विचारली. त्यावेळी प्रश्न विचारला म्हणून त्यांना 146 खासदारांना संसदेतून निलंबित केलं असल्याचे शरद पवारांनी म्हटले. बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्य नागरिकांचे विषय आहेत. गॅस दर 1100 रुपये झाला आहे. अन्नधान्य महाग झालं असल्याकडे पवारांनी लक्ष वेधले. आपण आता 140 कोटीच्या पूढे गेलो आहोत. यातील 54 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. लोकसंख्येचा दबाव वाढत आहे. शेतकऱ्याची अवस्था चिंताजनक झाली आहे. शेतकऱ्याचा बोजा कमी करण्यासाठी धोरणे आखण्याची आवश्यकता. मात्र त्यावर काम होतं नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली. एका बाजूने किमंत द्यायची नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर बंधने आणायची त्यामुळं जनता अडचणीत आली आहे. शेतकरी आत्महत्या संख्या लक्षणीय वाढली असल्याचे पवारांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed