• Wed. Apr 30th, 2025

मणिपूरमधून सुरुवात, मुंबईत शेवट, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मार्ग ठरला!

Byjantaadmin

Jan 4, 2024

मुंबई – rahul gandhi त्यांची भारत न्याय यात्रा सुरु करणार आहेत. 14 जानेवारीपासून राहुल गांधींच्या या यात्रेला सुरुवात होईल. तसेच राहुल गांधींच्या या यात्रेचं नावं देखील बदलण्यात आलं असून या आता या यात्रेचं नाव भारत जोडो न्याय यात्रा होणार आहे. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिलीये. या यात्रेची सुरुवात मणिपूरपासून होणार असून मुंबई त शेवट होईल. 14 जानेवारी रोजी दुपारी 12 नंतर या यात्रेला राहुल गांधी सुरुवात करतील. या यात्रेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच राहुल गांधी हे या यात्रेदरम्यान सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायविषयांवर आपले विचार लोकांसमोर मांडणार असल्याचं जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

 

Rahul Gandhi Congress Leader will start his Bharat Jodo Naya Yatra on 14 Jan 2024 from Manipur to Mumbai detail marathi news Rahul Gandhi : मणिपूरमधून सुरुवात, मुंबईत शेवट, राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा मार्ग ठरला! 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed