संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर
निलंगा, : यंदा पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने भविष्यात पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे तेव्हा प्रशासानाने संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे गावातील लोकप्रतिनीधीनीही पाण्याच्या नियोजणाबाबत सहकार्य करावे असे अवाहन माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गुरूवारी ता. चार रोजी आढावा बैठकीत केले.
येथील तहसिल कार्यालयात निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्याच्या कार्यालयीन प्रमुखाची आढावा बैठक घेतली याप्रसंगी त्यांनी हे अवाहन केले. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, तिन्ही तालुक्यातील विविध प्रकल्पातील पाण्याची स्थिती काय आहे संभाव्य टंचाई निवारण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, तालुक्यातील लहान- मोठ्या पशुधनाची संख्या किती, सध्या चारा उपलब्ध किती भविष्यात किती चारा लागणार याबाबतचे नियोजन करून कृति अराखडा तयार करावा शिवाय जलयुक्त शिवार योजनेसाठीचा तिसरा टप्पा याबाबतही सविस्तर माहीती संकलन करून जलजिवन मिशन अंतर्गत कामाची स्थिती काय, किती कामे पूर्ण झाली अपूर्ण राहण्याची कारणे याबाबतचा आढावा घेऊन प्रलंबीत विकास कामे तत्काळ मार्गी लावावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मतदार संघातील शाळांची स्थिती, शौचालय पूर्ण व अपूर्ण याबाबतची स्थिती, पिकविमा किती शेतकऱ्यांना मिळाला, किती महसूल मंडळे अपूर्ण राहीली शेतकऱ्यांना विजकनेक्शन जोडणीसाठी हलगर्जीपणा करू नका अशा सूचना देवून येत्या काळातील पाणीटंचाई, चाराटंचाई व दुष्काळ निवारण्यासाठी सज्ज रहावे असे अवाहन त्यानी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसिलदार उषाकीरण शृंगारे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॕ. निलेश कटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश क्षिरसागर, यासह तिन्ही तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.