आता नागरिकांना मिळणार सहाशे रूपये ब्रास दराने वाळू
जिल्ह्यातील पहीला वाळू डेपो निलंग्यात सुरू उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
निलंगा, ता. ३ विविध बांधकामासाठी नागरिकांना वाळूसाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते त्यामध्येच वाळू बहाद्दराकडून चढ्या भावाने वाळूची चोरून विक्री होत होती आता या प्रकाराला आळा बसणार असून नागरिकांना सवलतीच्या दरामध्ये ‘वाळू डेपोतून’ वाळू मिळणार आहे. जिल्ह्यातील पहील्या वाळू डेपोचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते सावरी ता. निलंगा येथे बुधवारी ता. तीन रोजी करण्यात आले.
निलंगा तालुक्यातील गिरकचाळ, शिरोळ-वांजरवाडा, औरादशहाजानी, सावरी, मानेजवळगा, शिऊर यासह आदी वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात बोटीद्वारे वाळूचा बेसुमार उपसा करून चोरट्या मार्गाने वाळू विक्री होत होती. याबाबत महसूल विभागाकडून अनेकवेळा कारवाया करूनही वाळू बहाद्दर वाळू काढणे व विक्री करणे थांबवत नव्हते. अखेर तालुक्यातील कांही वाळू घाटावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. तरीही चोरून वाळू विक्रीचे प्रकार सुरूच होते. अखेर निलंगा तालुक्यातील सावरी, गिरकचाळ व औरादशहाजानी येथील वाळू घाटाचा लिलाव जाहीर झाला असून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये वाळू मिळावी म्हणून नूसार प्रत्येनक वाळू घाटसाठी वाळू डेपेा तयार करण्यात आल्याने आता सर्व सामान्य नागरीकासाठी ६०० रूपये प्रति ब्रास दराने वाळू उपलब्ध होणार आहे. येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्याट हस्ते सावरी ता.निलंगा येथील वाळू डेपोचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यानंतर आता गिरकचाळ व औरादशहाजानी येथेही वाळू घाटाचा लिलाव झाल्याने त्या ठिकाणीही लवकरच वाळू डेपो तयार करण्यात येणार आहे. याप्रसंगी नायब तहसिलदार प्रविण आळंदकर, महसूल सहाययक श्री.रमेश विठठलराव पाटणकर, अमीर मोहमंद पटेल व इतर गावकरी उपस्थित होते. तालुक्यातील नागरिकांनी वाळूच्या मागणीसाठी अर्जदार म्हणून महागौणखनीज mahagaunkhanij या अॕपव्दवारे मागणी व नोंदणी नोंदविण्याचे अवाहन महसूल प्रशासकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहीलाच वाळू डेपो निलंगा येथे तयार झाल्याने आता जिल्हाभर वाळू घाटाचा लिलाव होऊन वाळू डेपो तयार होणार आहेत नागरिकांनाही आता सवलतीच्या दरामध्ये केवळ सहाशे रूपये ब्रांस प्रमाणे
वाळू मिळणार आहे.
शासन वेबसाईटचा खोडा
सदरील वेबसाईटवर अँप चालत नसल्याने वाळू नोंदणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे