६ जानेवारीला निलंगा येथे सकल मराठा समाजाची बैठक
निलंगा ( प्रतिनिधी) सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने ६ जानेवारी रोजी दुपारी ०३ वाजता शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.मराठा आरक्षणाची लढाई लढणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या २० जानेवारी रोजी अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी ला सुरुवात होणार असून यात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत आपणही सहभागी होऊन मराठा आरक्षण लढ्याला पाठबळ देण्यासंदर्भात योग्य आणि चोख नियोजन करण्यात येणार आहे. त्याच संदर्भात मुंबई मराठा आरक्षण पायीदिंडी मध्ये सहभाग व नियोजन या विषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. तालुक्यातील गावागावातील तसेच शहरातील तमाम मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहून पुढील आंदोलन संदर्भात नियोजन करण्यासाठी वेळ द्यावा मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.