• Tue. Apr 29th, 2025

अंतिम मतदार यादी 22 जानेवारीला होणार प्रसिद्ध मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी

Byjantaadmin

Jan 4, 2024
अंतिम मतदार यादी 22 जानेवारीला होणार प्रसिद्ध मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी
लातूर (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने 29 मे 2023 च्या पत्रान्वये 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्याचा 5 जानेवारी 2024 रोजी केली जाणार होती. मात्र आता प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असल्याने 5 जानेवारी ऐवजी 22 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 12 जानेवारी 2024 पर्यंत असून मतदार यादीची तपासणी करून अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याची कार्यवाही 17 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात येईल. तसेच अंतिम मतदार यादी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे दुबार नावे वगळणे तसेच मयतांची नावे वगळणे या कामासाठी 15 दिवसांचा अतिरिक्त अवधी मिळणार असून, नवमतदारांनादेखील नाव नोंदणीची पुन्हा संधी मिळणार आहे. नावे वगळल्याने मतदार यादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबरला जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांची नोंदणी तसेच मयत व दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी नऊ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. या अर्जावर 26 डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात आली. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांमध्ये ही मुदत आता 12 जानेवारी केली आहे. तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.
या दरम्यान दुबार नावे, तसेच मयतांची नावे वगळणे हे काम प्रामुख्याने करण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासोबतच नवमतदारांनाही नोंदणीसाठी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता 5 जानेवारीऐवजी 22 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी मतदार यादीत नव्याने मतदारांची नाव नोंदणी करण्या चे अवाहन श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा्धिकारी तथा जिल्हाय निवडणूक अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed