शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आता जवळपास शिष्टाचार झाला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. शिक्षण विभाग आणि शिक्षकांच्या लाचखोरीचे प्रकरणं सतत पुढे येत आहेत. याबाबत सातत्याने नवे प्रकार पुढे येत असल्याने शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलू लागला आहे. शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस या गावातल्या आदिवासी प्रकल्प शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांना चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापिकेस लाच घेताना अटक झाल्याने आता तो चर्चेचा विषय बनला आहे.शिक्षक राजेंद्र चौधरी हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या गटविमा योजनेतील बिल मंजूर करण्यासाठी कोषागार कार्यालयात फाईल पाठविणे आवश्यक होते. शाळेकडून त्याला मंजुरी मिळावी यासाठी ते मुख्याध्यापिकेकडे पाठपुरावा करीत होते. गटविमा योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापिका जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती, त्यावर तडजोड होऊन चार हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली मुख्याध्यापिके जगताप यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई केल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या कार्यालय आणि घरी तपासणी केली. एसीबीच्या निरीक्षक रूपाली खांडवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागातील मुख्याध्यापिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे झालेली ही कारवाई आहे.
नाशिकच्याACB पथकाने मावळत्या वर्षात 165 होऊन अधिक सापळे यशस्वी केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुनीता धनगर आणि अन्य कारवाईंचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. शिक्षण विभागातील गैरप्रकारांमुळे हा विभाग सातत्याने चर्चेत आहे. नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्याध्यापिकेस लाच घेताना कारवाई झाल्याने येत्या वर्षभरात काय घडेल ही उत्सुकता आहे.