सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप
लातुर-सावित्रीबाई फुले जयंती उत्सव निमित्ताने शिवसेना, युवती सेना , शिवसेना महिला आघाडी (ठाकरे गट) तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व फुले वाहून आभिवादन करण्यात आले मन्यवरांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले या वेळी बालविवाह, केशवपन, अंधश्रध्दा, अनिष्टरूढी, परंपरांची चौकट मोडून परिवर्तनवादी विचार समाजात रूजवण्यासाठी आपलं संपुर्ण आयुष्य खर्ची घालणा-या स्त्री शिक्षणाच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 19 व्या शतकामध्ये आसलेल्या जुन्या रुढी परंपरा बदलण्यासाठी त्याग केला महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेला संघर्ष अविस्मरणीय आहे. त्यांनी शिक्षणासाठी घेतलेली मेहनत त्यांच्या कष्टामुळेच आज सरपंच ते राष्टपती व उच्च पदापासून ते अंतराळवीरापर्यंत महिलांनी झेप घेतली त्याचा सार्थ अभिमान आहे. आता घरो घरी सावित्रीबाई फुलेच्या विचाराची गरज आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले तसेच शिवसेना युवती जिल्हाध्यक्षा ॲड श्रध्दा जवळगेकर यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना पाणी बाॅटेल देण्यात आले. शिवसेना महिला जिल्हा संघटीका सुनिताताई चाकळ व युवती जिल्हा प्रमुख ॲड श्रद्धा जवळगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पाडला, महिला उपजिल्हा संघटीका हेमलता पवार,शहर संघटिका सुवर्णा वाघमारे,दुर्गा अंधारे व शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.