• Wed. Aug 6th, 2025

महिला उद्योजक कक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदी प्रितम जाधव यांची  निवड

Byjantaadmin

Jan 4, 2024
महिला उद्योजक कक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदी प्रितम जाधव यांची  निवड
निलंगा( प्रतिनिधी)  मराठा सेवा संघ प्रणित उद्योजक कक्षाची बैठक  दि 23 डिसेंबर 2023 रोजी लातूर येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या माध्यमातून मराठा समाजातील नवतरुण यांना उद्योजक क्षेत्रात आणण्यासाठी व स्व आर्थिक प्रगती करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी महत्वपूर्ण  बैठक लातूर येथे विश्रामगृहात उद्योजक कक्षाचे अध्यक्ष  सांगलीचे उद्योजक शाहीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व लातूर जिल्हा उद्योजक कक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे या मध्ये महिला जिल्हाध्यक्ष पदी प्रितम जाधव अजय शेळके लातूर तालुका अध्यक्ष पदी गोविंद जाधव यांची औसा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनंत गायकवाड लातूर जिल्हा उद्योजक अध्यक्ष  निखिल मोरे  उपाध्यक्ष  मिथुन दिवे हे उपस्थित होते यावेळी शाहीर यांनी  ग्रामीण भागातील मराठा तरुणांना उद्योजक क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार उद्योजक क्षेत्रातील प्रशिक्षण मिळावे घेऊन ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात आर्थिक साक्षर करण्यासाठी हि उद्योजक क्षेत्रातील पदाधिकारी कार्य करणार आहेत या निवडीमुळे सर्व नूतन पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले आहे भालचंद्र झांजे सुधाकर पाटील वैभव तळेकर अशोक सोमासे प्रवीन साळुंके सुयेस कनसे अशीतोश बीरादार प्रशांत पाटील आकाश गायकवाड गनेश जगताप  पवार सचीन गोवींद जाधव  उद्योजकांनी हजेरी लावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *