लातूर जिल्हा बँकेची आदर्शवत कामगिरी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनस्कर यांचेकडून जिल्हा बँकेचे कौतुक
लातूर -राज्यातील जिल्हा बँका वर्तमान परिस्थितीत विकास प्रक्रियेत चांगल्या कार्य करीत असून त्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सक्षमपणे नेत्रुत्व करीत आहे कृषि क्षेत्रात राज्य बँक, लातूर जिल्हा बँक, पतपुरवठा सहकारी संस्था या त्रिस्तरीय संरचनेत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरीव आदर्शवत कामगिरी करत आहे असे प्रतिपादन राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनस्कर यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते मंगळवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयास भेट देऊन बँकेच्या कार्याची माहिती घेतली त्यानंतर बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
दूरदृष्टी नेत्रुत्व दिलीपराव देशमुख तर अर्थक्षम नेत्रुत्व धीरज देशमुख यांच्या मुळे जिल्हा बँकेने वेगळेपण जपले
यावेळी बोलताना राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनस्कर म्हणाले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाढीव ठेवी, उत्कृष्ठ व्यवस्थापन, सभासदांना देण्यात येणाऱ्या विविध योजना, सजग कर्मचारी , स्वनिधितील ठेवी वाढ, सहज, सुलभ, तत्पर कर्ज सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अतिशय चांगल्या सेवा देणारी ही लातूर जिल्हा बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सक्षम दूरदृष्टी नेत्रुत्व तर बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांचे अर्थक्षम नेत्रुत्व असल्याने हे शक्य झाले असल्याचे सांगून त्यांनी लातूर बँकेच्या विविध कार्याचे कौतुक केले
उत्कृष्ठ व्यवस्थापन
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनस्कर यांनी बँकेने कोरोना काळात अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून ग्राहकांना फिरते वाहन (ब्रंचं ऑन व्हील ) द्वारें घरपोच सेवा दिली आजही लोकांना त्यांच्या गावात सेवा देत आहे असे सांगून बँकेने लेखा परीक्षनात कायम अ वर्ग दर्जा ठेवलेला आहे तसेच कर्ज वाटप मध्ये आघाडी घेतली असून आदर्श जोखीम व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून काटेकोर अंमलबजावणी करत सहकाराची तत्वे , निक्षित उत्पन करिता स्वतेंत्र गुंतवणूक धोरण राबवणारे, मूल्य जोपासणारी, निर्णय प्रक्रियेत सहभागी असणारी सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवून लातूर जिल्हा बँकेने वेगळेपण जपले आहे तसेच शेतकऱ्यांना हार्वेस्टर वाटप करून युवकांना प्रवाहात आणण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी बँकेने भरीव कामगिरी केली असल्याचे सांगुन बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व संचालक मंडळ व बँकेच्या कार्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
यावेळी जिल्हा बँकेच्या मुख्यालयात बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांच्या हस्ते राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनस्कर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव यांनी करत बँकेच्या कार्याची माहिती दिली याप्रसंगी बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ ,संचालक दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने ,अनुप शेळके अँड राजकुमार पाटील , संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे ,कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, विविध खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.