• Tue. Apr 29th, 2025

हमालाच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून श्रमाचे केले मोल औसा तालुका खरेदी विक्री संघात कष्टकऱ्याला मानाचे पान  

Byjantaadmin

Jan 3, 2024
हमालाच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून श्रमाचे केले मोल औसा तालुका खरेदी विक्री संघात कष्टकऱ्याला मानाचे पान
औसा/ प्रतिनिधी घाम गाळत पोती उचलून आपल्या कुटुंबासह समाजचे  जगणे समृद्ध करणाऱ्या हमालाच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून औसा तालुका खरेदी विक्री संघाने   श्रमाचे मोल करत कष्टकऱ्याला मानाचे पान दिले.
औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने २०२४ वर्षाचे कॅलेंडर काढण्यात आले आहे. त्याचे  प्रकाशन एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या हस्ते न करता खरेदी विक्री संघाच्या आवारातच कष्ट करणाऱ्या श्रमिकाच्या हस्ते करण्याचा निर्णय औसा तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी यांनी घेतला. कधीही काम न चुकवत दररोज शे, दीडशे पोती उचलत कष्टाचे, स्वाभिमानाचे आणि  प्रामाणिकपणाचे जीवन जगणाऱ्यालाही मनाचे पान मिळावे म्हणून सोमवंशी यांनी हा उपक्रम राबवला. अलीकडे  श्रमाचे मोल नि महत्त्व नाकारले जात आहे. किंबहुना कष्टाला कमी लेखले जाते किंवा मजबुरी सदराखाली गृहीत धरले जात आहे. हा प्रकार शासन, प्रशासन, समाज, संस्था, व्यक्ती आदी सगळ्याच घटकांकडून होत आहे. परंतु सोमवंशी यांनी घाम गाळणाऱ्याची किंमतही प्रभावशाली गटात केली.
औसा  तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमी भावाने मालाची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे कार्य औसा तालूका शेतकरी सहकरी  खरेदी विक्री संघामार्फत होत आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम संघ करीत आहे.  यानिमित्त काढण्यात आलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन हमाल श्री.महादेव पुंड यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख लातूर आणि खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी , उपसभापती शेखर चव्हाण,महिला उपजिल्हा संघटीका सौ. जयश्रीताई उटगे बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, उपजिल्हाप्रमुख अभिजीत जाधव, विलास लंगर, श्रीधर साळुंके, संजय पाटील, चंद्रकांत तळेगावे, अजित सोमवंशी, विजय पवार, शिवाजी सावंत, किशोर भोसले,ॲड. मझर शेख, राम चव्हाण, श्रीहरी काळे, सुनील खंडागळे, राहुल मोरे, शिवराज पाटील, मारुती मगर कारखाना संचालक अनिल पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed