महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी विष्णु लक्ष्मण मुळे याची दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्तरीय प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पथसंचलनासाठी (परेड) निवड झाली आहे. यासाठी दिनांक १७ ते २६ जानेवारी २०२४ या १० दिवसांच्या कालावधीत स्पोर्ट्स कॉम्पलेक्स विद्यानगरी, कलीना, मुंबई येथे आयोजित तालीम शिबिरात तो सहभागी होणार आहे.
त्याचबरोबर महाविद्यालयातील रासेयोची स्वयंसेविका कु. सरस्वती राजू लंगुटे हीची एम.एल.आर. इंस्टिट्यूट औफ टेक्नॉलॉजी, मलकाजगीरी, हैदराबाद येथे दिनांक १४ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिर (National Integration Camp) साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उपलब्धी बद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटिल निलंगेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचे अभिनंदन करुन पथसंचलनासाठी व राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचीव, मा. बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.