आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाना तात्काळ विहीर मंजूर…
गट विकास अधिकाऱ्याची कार्यतत्परता
निलंगा/प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील हाणमंतवाडी हाडोळी येथील आल्पभूधारक शेतकरी ग्यानदेव निकम यानी कर्जबाजारी पणाला कंटाळून आपले जीवन संपविले होते.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली होती.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी सुनिता ग्यानदेव निकम यानी मागील आठवड्यात सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी निलंगा पंचायत समितीमध्ये प्रस्ताव दाखल केला होता.याची तात्काळ दखल घेऊन कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सोपान अकेले यानी तात्काळ सदरील प्रस्ताव मंजूर करून संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या नातेवाईकाला सिंचन विहीर मंजूरीचा कार्यारंभ आदेश देऊन कार्यतत्परता दाखवली असल्याने लाभार्थी महिलेने आभार माणले आहेत. यावेळी नरेगा कक्ष प्रमुख संजय मुगळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अनिल भंडारे,तांञिक सहाय्यक नशीर गुडवाले आदी उपस्थित होते.