ज्ञानज्यती सावित्रीबाई फुले यांची निलंगा शहरात जयंती साजरी
निलंगा-माळी सेवा संघ व सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व फुले वाहून आभिवादन करण्यात आले. यावेळी माळी सेवा संघ जयंती उत्सव समितीच्या व सामाजीक, राजकीय व विविध संघटनेच्या पदाधिकारी मन्यवरांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले या वेळी सर्व धर्मीय जयंती समितीचे समन्वयक प्रा. दयानंद चोपणे म्हणाले की, बालविवाह, केशवपन, अंधश्रध्दा, अनिष्टरूढी, परंपरांची चौकट मोडून परिवर्तनवादी विचार समाजात रूजवण्यासाठी आपलं संपुर्ण आयुष्य खर्ची घालणा-या स्त्री शिक्षणाच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 19 व्या शतकामध्ये आसलेल्या जुन्या रुढी परंपरा बदलण्यासाठी त्याग केला महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेला संघर्ष अविस्मरणीय आहे. त्यांनी शिक्षणासाठी घेतलेली मेहनत त्यांच्या कष्टामुळेच आज सरपंच ते राष्टपती व उच्च पदापासून ते अंतराळवीरापर्यंत महिलांनी झेप घेतली त्याचा सार्थ अभिमान आहे. आता घरो घरी सरस्वती ऐवजी सावित्रीबाई फुलेच्या विचाराची गरज आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्तिथामध्ये माजी जि.प. अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, प्रदेश कॉग्रेसचे सचिव अभय साळुके, माजी नगराध्यक्ष सुनिताताई चोपणे, वंचीतच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजूशाताई लिंबाळकर, तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्य हमिद शेख, सामाजीक कार्यकर्ते रजनीकांत कांबळे, डॉ. सेलचे अरविंद भातांब्रे, सलक मराठा समाजाचे विशाल जोळदापके, मराठा सेवासंघाचे एम.एम. जाधव, डी.बी बरमदे, ड़ी. एमन बरमदे, माधव गाडीवान, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम, बौध्द महासभेचे प्रा. रेहीत बनसोडे, वंचीतचे देवदत्त सुर्यवंशी, दापक सरपंच लाला पटेल, मुख्याध्यापक मोहन नटवे, सेवासंघाचे प्रा. अभिमन्युव पाखरसांगवे, फुले ब्रगेडचे जिल्हा अध्यक्ष, सुनिल वांजरवाडे, लहूजी सेनेचे गोविंद सुर्यवंशी, गणजराज संघटनेचे रामलिंग पटसाळगे, समताप्रदेचे अध्यक्ष, डॉ. मिथुन जाधव, युवा सेनेचे प्रशांत वांजरवाडे, शिवाजी भोजने, संजय चोपणे, निळकंठ पेठकर सिवानंद दवणे, विकास पुजारी, सतिष कोरके, नवनाथ पेठकर, धनराज वाघमारे, वैजनाथ चोपणे, सौ. मंगल दवणे, सगर पूजाताई, पुजारी ताई, इं. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व अभार श्री विठ्ठल चांभारगे यांनी केले.