विद्यापीठाच्या विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाचा संघ विजेता
निलंगा:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले आहे. देगलूर जि. नांदेड येथे पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये कु. सूर्यवंशी रोहिणी या संघनायक विद्यार्थिनी व डॉ. गोपाळ मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली कु. म्हेत्रे संध्याराणी, कु.सूर्यवंशी साक्षी, कु. सूर्यवंशी प्रियंका, कु. कांबळे राऊ,कु.सूर्यवंशी पल्लवी, कु.आकडे वर्षाराणी, कु. येळेकर संध्याराणी, कु. सूर्यवंशी शुभांगी यांनी विजेत्या पदाचा हा बहुमान प्राप्त करून दिला. या यशाबद्दल या संपूर्ण संघाचा महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन.कोलपुके, महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एस. पाटील, संगणक शास्त्र विभागाचे प्रा. आर. एस. मदरसे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. बॉल बॅडमिंटन स्पर्धेतील या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.