केपटाऊन: दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पार लोटांगण घातले. डी एन एल्गरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा हा निर्णय पार चुकीचा ठरल्याचे सिराजने सिद्ध करून दाखवले. मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत १५ धावांमध्ये ६ विकेट्स घेत आपला दबदबा निर्माण केला.
सिराजने सामन्याच्या चौथ्या षटकापासून विकेट्स घेण्यास सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेला एकावर एक धक्के देत राहिला. सिराजने एडन मार्करम, जॉर्झी, बेडिंगहॅम, काइल वेरेन आणि मार्को यान्सन यांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्याचा पहिला बळी ठरला एडन मार्करम. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने एक शानदार चेंडू टाकला जयस्वालने अप्रतिम झेल टिपत त्याला बाद केले. इतकेच नव्हे तर सिराजने अवघ्या ९ षटकात १५ धावा देत या ६ विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजची कसोटी क्रिकेटमधील ही सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे.सिराजने १६ व्या षटकातच पाच विकेट्स पूर्ण केल्या आणि दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३४धावांत ६ विकेट्सपर्यंत आली होती. यानंतर त्याने काईल व्हेरिनला बाद करून आपली सहावी विकेट घेतली. याआधी कधीच सिराजने कसोटी सामन्याच्या एका डावात सहा विकेट घेता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्याच्या एका डावात सहा किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी हरभजन सिंग आणि रविचंद्रन अश्विन यांनी दोनदा प्रत्येकी ७ विकेट घेतल्या होत्या. तर शार्दुल ठाकूरनेही ७ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचे केले वस्त्रहरण, अवघ्या ५५ धावांत संघ ऑल आऊट
केपटाऊन: भारताच्या गोलंदाजांनी आणि संपूर्ण संघानेच शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या ५५ धावांत ऑल आऊट केले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्यादिवशीच ते ही पहिल्याच सत्रात दक्षिण ऑल आऊट करत भारताने विजयाच्या उद्देशाने संघ उतरला असल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले. भारताकडून मोहम्मद सिराजने ६ विकेट, मुकेश कुमारने २ विकेट आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेत भारताला या सामन्यात आघाडी मिळवून दिली. दक्षिण आफ्रिकेकडून बेडिंगहम आणि व्हेरियन या दोन खेळाडूंनाच १० पेक्षा अधिक धावा करता आल्या. याशिवाय इतर फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.
मोहम्मद सिराजने केपटाऊन कसोटीत ६ विकेट घेतल्या आहेत. सिराजसमोर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ कोसळला. सिराजने आज पुन्हा एकदा दाखवून दिले की त्याला जगातील सर्वात घातक गोलंदाज का म्हटले जाते. मोहम्मद सिराजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यापूर्वी सिराजची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ६० धावांत ५ विकेट्स घेणे, आता सिराजने ६ विकेट घेत आपलाच विक्रम मोडला आहे. मोहम्मद सिराजशिवाय मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनीही आज २ विकेट घेतले.
दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धची सर्वात कमी कसोटीमधील धावसंख्या
५५ धावा- केपटाऊन कसोटी, २०२३
७९ धावा- नागपूर कसोटी, २०१५
८४ धावा- जोहान्सबर्ग कसोटी, २००६
१०५ धावा- अहमदाबाद कसोटी, १९९६
१०९ धावा- मोहाली कसोटी, २०१५
A five-wicket haul for Mohammed Siraj 🔥
What a session this has been for India!#WTC25 | 📝 #SAvIND: https://t.co/ie8HUxBDc8 pic.twitter.com/LIJrJvv5qa
— ICC (@ICC) January 3, 2024