जीवनात यशस्वी होण्यासाठी पंचसूत्रीचा वापर आवश्यक शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
लातूर ः जिद्द, शिस्त, प्रामाणिकपणा, चिकाटी व सातत्य या पंचसूत्रीच्या आधारे जीवनात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन अमेेरिकेच्या नामांकित आयटी कंपनीतील अभियंता दीपाली पाटील यांनी केले. येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित विजयपथ शोध करिअरचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अमेरिकेतीलच आयटी कंपनीतील अभियंता दीपाली पाटील यांच्यासह स्वाती निटुरे व अभियंता श्रीकांत पाटील यांच्या मुलाखती स्कूलचे प्राचार्य दत्ता घारगे यांनी घेतल्या. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील व उपाध्यक्ष एल. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दीपाली पाटील म्हणाल्या, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयटी क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. या क्षेत्रात जगाशी जोडले जाता येते. आपण स्वतःला जेवढे वाहून घेऊ तेवढे यश मिळत जाते, यासाठी विद्यार्थ्यांनी आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी दीपाली पाटील यांच्यासह मान्यवरांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य विलास गायकवाड यांनी केले. आभार रहेमत सय्यद यांनी मानले.
शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आयटी कंपन्यांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
