लातूर शहरात डॉ. लहाने यांच्या हस्ते ‘श्री ‘ क्लासेसचा शुभारंभ
लातुर(प्रतिनिधी):- प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे यांच्या निलंगा येथील २५ वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या ‘श्री ‘ क्लासेसला मिळालेल्या प्रचंड यशानंतर लातूरच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी लातूर शहरात या क्लासेसच्या शाखेचा शुभारंभ सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी संपन्न झाला आहे.
जगप्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो, “सर्व शहाणीसुरती माणसे जगरहट्टीशी जुळवून घेतात. काही चाकोरीबाहेरची व्यक्तिमत्वे जगरहट्टीलाच आपल्याशी जुळवून घ्यायला भाग पाडतात. जगामध्ये जी प्रगती झालेली आहे, ती अशा चाकोरीबाहेरच्या माणसांकडून, त्यांच्या सदैव नाविन्याच्या शोधात असलेल्या वृत्तीतून झालेली आहे. ” मला वाटते, तरंगे सरांनी निलंग्यात जी प्रगती केलेली आहे, त्याचं रहस्य जॉर्ज बर्नार्ड शॉच्या या वाक्यात दडलेलं आहे.
दर्जेदार शिक्षणाचा ध्यास घेतलेली एक उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून राज्य आणि देश पातळीवर ‘श्री ‘ क्लासेसचा झालेला गौरव, ही त्यांच्या आजवर निष्ठेने केलेल्या कार्याची पावती म्हणावी लागेल ! सकारात्मक दृष्टिकोन, नाविन्याचा शोध, या व्यवसायात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, पालकांचा संपादन केलेला विश्वास आणि उज्ज्वल निकाल या जोरावर श्री क्लासेसने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. माध्यमिक स्तरावर गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मूलभूत विषयाचे वर्ग एकाच छत्राखाली ऑनलाइन आणि
ऑफलाइन चालवले जाणारे लातूर जिल्ह्यातील हे बहुदा एकमेव केंद्र असावे.
ट्युशन कसं चालवावं ?याचा उत्तम वस्तूपाठ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जावं, असं मला वाटतं. ट्युशनकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक आणि उद्दात राहिला आहे. ते केवळ व्यवहारवादी दृष्टिकोनातून क्लास चालवत नाहीत; तर त्यात कौटुंबिक नात्याचा अंश असतो. त्यामुळे त्यांच्या ट्युशनमधील शिक्षक आणि विद्यार्थी , शिक्षक आणि पालक यांच्यातील संबंध केवळ व्यावहारिक पातळीवरचे न राहता ते भावनिक पातळीवर जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण ट्युशनमध्ये शिकत नाही तर एका चांगल्या शाळेत शिकल्याचा अनुभव येतो.
परिस्थितीची पावले ओळखून स्वतःत बदल करण्याची त्यांची प्रचंड क्षमता आहे. कोरोना काळात भलेभले वर्ग बंद पडले. पण त्यांचा क्लास बंद पडला नाही. उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापर्यंत त्यांचे क्लास पोहोचले आणि आजही ते अव्याहतपणे चालू आहेत. बदललेल्या परिस्थितीचा अचूक वेध घेण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे असल्यानेच त्यांना हे साध्य करता आलं.
‘मंजिले उन्ही को मिलती है,
जिनके सपनो मे जान होती है ।
पर से कुछ नही होता ,
होसलोंसे उडान होती है ॥
असा बुलंद होसला ठेवून लातूर शहराच्या शिक्षणक्षेत्रात पाय रोवणाऱ्या तरंगे सरांचे आणि त्यांच्या टीमचे हार्दिक स्वागत आणि पुढील यशदायी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
डॉ. नरसिंग वाघमोड लातूर