धनगर समाजाचा 18 वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा संपन्न
लातूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वांगीण विकास मंडळ, लातूर यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी धनगर समाजाचा 18 वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा विष्णुदास मंगल कार्यालय अहिल्यादेवी होळकर चौक, लातूर येथे संपन्न झाला.
या मेळाव्याचे उद्घाटन आ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हाधिकारी भा. ई. नगराळे, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष देविदास भाऊ काळे हे होते. मंडळाचे अध्यक्ष अॅड. मा. गो. मांडुरके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावर्षीच्या वधू वर सूचक मंडळाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. सिद्राम सलगर, सचिव अॅड. मंचकराव डोणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे, संभाजीराव सुळ, सुरेश अभंगे, रामकिशन मदने, इंजि. रामराव रोडे, मनोज राजे, संभाजी बैकरे, राम पाटील, सुजित वाघे, नवनाथ कवितके, संपत गंगथडे, रामचंद्र मदने, अॅड. सिद्धेश्वर धायगुडे, उद्धव दुधाळे, अॅड. जीवन करडे, अॅड. राजेश बनसोडे, सुभाष लवटे, दगडू हजारे आदी मान्यवर उपस्थित होते