• Tue. Apr 29th, 2025

अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, अजित पवारांचा वार, शरद पवार ढाल बनून तयार!

Byjantaadmin

Dec 25, 2023

अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात दंड थोपटले. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि (Dilip Walse Patil) प्रयत्न केला, नाव न घेता(Ajit Pawar) यांन(Amol Kolhe) यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट आव्हान दिलं आहे. यावार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी स्वत: संसदीय काम करतो. म्हणजे, मला त्यांचे निर्णय माहितच नसतात. उद्या त्यांच्या संसदीय कामात मी लक्ष देईन का? आणि सतत आमच्यामध्ये चर्चा होत असते.”

Sharad Pawar on Amol Kolhe and Ajit Pawar Statement Shirur Lok Sabha constituency NCP Political Crisis Maharashtra Politics Marathi News अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार, अजित पवारांचा वार,  शरद पवार ढाल बनून तयार!

 

आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही एकत्र बसून निर्णय घ्यायचो : शरद पवार 

‘मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी नेहमी घेतली,’ शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. तर आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना सणसणीत टोला लगावला आहे.

मी स्वत: संसदीय काम करतो. म्हणजे, मला त्यांचे निर्णय माहितच नसतात : शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “मी स्वत: संसदीय काम करतो. म्हणजे, मला त्यांचे निर्णय माहितच नसतात. उद्या त्यांच्या संसदीय कामात मी लक्ष देईन का? आणि सतत आमच्यामध्ये चर्चा होत असते. त्या जागेबद्दल काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते. पण अन्य कुठल्या बाबतीतील वाद त्यांनी कधी माझ्या कानावर घातला नाही, जो घातला तो, मतदार संघाच्या कामांसबंधित होता.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “प्रत्येकाचा जो-तो अधिकार आहे, प्रत्येक राजकीय व्यक्तीचा तो अधिकार आहे. त्यांचं उमेदवार निवडायचे बदलायचे, काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे.” त्याच्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही.

आज कुणी काय केलं असेल, त्याच्याही तक्रार करायची कारण नाही. फक्त पक्ष महत्वाचा : शरद पवार 

तुमच्या बंडात आणि अजित पवारांच्या बंडात काय फरक? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “आमच्या काळात बंड नव्हतं. आम्ही बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायाची. आज कुणी काय केलं असेल, त्याच्याही तक्रार करायची कारण नाही. फक्त पक्ष महत्वाचा आहे. त्याचा संस्थापक कोण राहिलेय? लोकांनी या पक्षाला मोठं केलं. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोरच आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed