• Tue. Apr 29th, 2025

अजित पवारांकडून बारामतीच्या होम ग्राऊंडवर भाजपसोबत जाण्याचं समर्थन, शरद पवारांचं नाव न घेता म्हणाले…

Byjantaadmin

Dec 24, 2023

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र एकमेकांवर प्रति दावे केले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना थेट शरद पवारांवरच निशाणा साधला.इतरांचं लय वर्ष ऐकलं. आता तुम्ही माझं ऐका. तुम्हाला असं काय करून दाखवतो. असं म्हणत काम करण्याचा प्रत्येकाचा एक काळ असतो. उमेदीचा काळ असतो. मधला काळ असतो. आम्ही वरिष्ठांना सगळ्यांना सांगितलं. आतापर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलो. जिल्हा, तालुका राष्ट्रवादीमय कसा राहील. या सगळ्या गोष्टी करत आलो. मी एक आठवण तोंडपाठ आहे म्हणून सांगतो १९६७ नवीन नेतृत्व या ठिकाणी आलं. तेव्हा ते १७ हजारांनी निवडून आलं. १९७२ साली ३४ हजारांनी निवडून आलं. १९७८ ला १८ हजारांनी निवडून आलं. १९८० ला २५ हजारांनी निवडून आलं. ८५ ला विरोधक केवळ १८ हजारांनी पडले. १९९० माझ्यासारखे तरुण काम करू लागल्यावर १ लाखाने जागा निवडून आली. त्यानंतर आम्ही कधीच मागेपुढे बघितले नाही. त्यानंतर सतत लाखांच्या पुढेच लीड गेलं, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.Ajit Pawar criticizes Sharad Pawar

वेगळी भूमिका घेतल्याच्या मुद्द्यावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, याबाबतची भूमिका घेत असताना वर्षभर चर्चा चालू होत्या. आज जवळपास ५३ पैकी ४३ आमदार येतात. २ अपक्ष आमदार पाठिंबा देतात. विधान परिषदेचे ६ आमदार येतात याचाच अर्थ मी घेतलेली भूमिका बरोबर आहे. म्हणूनच हे सर्व माझ्याबरोबर येतात. कोणालाही दमबाजी मी केली नाही, असं म्हणत अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले.प्रत्येकाचा एक काळ असतो. जास्त वय झाल्यानंतर तुम्ही आराम करा. आशीर्वाद द्या. तुमच्या अनुभवाचा आम्हाला सल्ला द्या, असं म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांना सर्वांनी मन लावून एकजुटीने काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला. तसेच जीवाला जीव देणारे माझे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सुखदुःखात नेहमीच मी सहभागी असतो. हे चांद्यापासून बांधापर्यंत सर्वांनाच माहिती आहे. अशा कार्यकर्त्यांना मी कधीच अंतर देत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed