• Tue. Apr 29th, 2025

मैत्रिणींसोबत भंडारदरा सांधण व्हॅली पाहायला गेली अन् भयंकर घडलं

Byjantaadmin

Dec 24, 2023

अहमदनगर: सध्या विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण पर्यटनासाठी नियोजन करत आहे. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी सकाळी मुंबई येथील तरुणींचा समूह पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे आले होते. आपल्या मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणीचा सांधण व्हॅली बघत असताना पाय घसरून ती खाली पडली आणि डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मृत्यू झालेल्या तरुणीची आपल्या मैत्रिणींसोबतची शेवटची भेट ठरली.याबाबत अधिक माहिती अशी की, आज रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील साम्रदजवळील सांधणदरी जवळ ऐश्वर्या खानविलकर नामक तरुणी आली आणि ती घाली डोकावून पाहत असताना तिचा पाय घसरून ती दरीत पडल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून खाली खडकावर तिचं डोकं आपटले गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील अनेक पर्यटक येत असून तरुणींचा समूह देखील सकाळीच दाखल झाला होता. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण सांधण दरीत गेले.

Ahmednagar girl died

 

निसर्गाचा चमत्कार न्याहाळीत असतानाच त्यातील ऐश्वर्या खानविलकर (वय २४ वर्षे, रा. दहिसर, मुंबई) या तरुणीचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली. दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत राजुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच, सदरील मृतदेहाला ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले आहे. याबाबत पुढील तपास राजुर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed