स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर महाराष्ट्र महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीची निवड
निलंगा:- येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सपना पांचाळ हिची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या दोन विषयाच्या अभ्यास मंडळावर तसेच कु.माशाळकर ऋतुजा या विद्यार्थिनीची रसायनशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळावर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झालेली आहे. विद्यापीठाच्या सर्व विषयाच्या अभ्यास मंडळांवर त्या त्या विषयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यातूनच कु. सपना पांचाळ व कु.माशाळकर ऋतुजा ह्यांची निवड झालेली आहे. मागील तीन शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयातील विविध शाखेतील, विविध विषयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन त्यांची अभ्यास मंडळावर निवड झालेली आहे, यावर्षीही ही परंपरा कायम राहिली. अभ्यास मंडळावर या विद्यार्थिनीची निवड झाली ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे. कु. सपना पांचाळ व कु. माशाळकर ऋतुजा यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब ,सचिवबब्रुवानजी सरतापे, प्राचार्य डॉ. माधवराव कोलपूके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.