खुमसे परिवारांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून सांत्वन
लातूर दि. २४.रेणापूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड,दिवंगत मुर्गाप्पा खुमसे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्याबद्दल राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी रविवारी रेणापूर येथे त्याच्या निवासस्थानी भेट देऊन स्वातंञ्य सेनानी कॉम्रेड मुर्गाप्पा खुमसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी खुमसे परिवारातील लातूरच्या माजी महापौर स्मिता खानापूरे,शिवराजजी खुमसे,राहुल खुमसे , प्रदिप मिरजकर , प्रविण खुमसे, रोहित खुमसे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील , रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाइस चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,रेणाचे संचालक पंडीत माने, अनिल कुटवाड, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, अशोक पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मतीन अली सय्यद , संगायो समिती चे माजी अध्यक्ष गोविंद पाटील,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश सोमानी, कॉग्रेसचे गटनेते पदम पाटील,भुषण पनुरे , रामलिंग जोगदंड , अमृतेश्वर स्वामी , धनाजी भांबरे, बळी कुरे आदी मान्यवर उपस्थित होते.