• Tue. Apr 29th, 2025

मुंबईत भरदुपारी धाड धाड, गोळीबाराचा थरार

Byjantaadmin

Dec 24, 2023

मुंबई : मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाली आहेत. ही घटना घडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद गल्ली, व्ही.एन. पूर्व मार्ग या ठिकाणी हा गोळीबार झाला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. गुंड पप्पू येरुणकर असं ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला त्यापैकी एकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mumbai Chunabhatti Firing

प्राथमिक माहितीनुसार पप्पू येरुणकर काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्याचा काही गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. पोलिसांनी जुन्या वादातून आजची गोळीबाराची घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे.

दुचाकीवरुन आलेल्यांकडून गोळीबार

मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद गल्ली येथे दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी १६ राऊंड फायर केले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. सुमित येरुणकर हा तरुण आजच्या गोळीबारात ठार झाला असून तिघे जखमी आहेत.

गोळीबाराचं कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपआपसातील दुश्मनीतून हा गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांच्या शोधासाठी नऊ पथके तयार करण्यात आलेली आहेत. आता पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी नऊ पथके तयार केल्यानंतर त्यांना केव्हा अटक करण्यामध्ये यश येतं, हे लवकरच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed