• Tue. Apr 29th, 2025

मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, पुण्यातील घरी कॉरनटाइन

Byjantaadmin

Dec 24, 2023

देशभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकं वर काढलं आहे. जेएन.1 (JN.1)या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत.

 

maharashtra minister dhananjay munde positive for coronavirus marathi news update मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, पुण्यातील घरी कॉरनटाइन 

कोरोना विषाणू अद्याप संपलेला नाही. जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकं वर काढलेय. मागील महिनाभरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाचे आठ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या काळात तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात आढळलेली रुग्ण मागील महिन्याच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. मृतांचा आकडाही वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 40 देशांतील कोविड डेटाच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. WHO च्या रिपोर्टनुसार, या महिन्यात कोरोनाच्या जेएन.1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये  सौम्य लक्षणे दिसत आहेत. पण ज्याप्रकारे रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता WHO ने सर्व देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

भारतातही कोराना रुग्णांच्या संख्येत वाढ – 
मागील 15 दिवसांमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3742 इतकी झाली आहे. जेएन.1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सक्रीय रुग्णांच संख्या दुपट्ट झाली आहे. जगभराप्रमाणेच भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

भारतात किती धोका ?

मागील काही दिवसांतील कोविड डाटाच्या रिपोर्ट्सनुसार, भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पण सध्या असलेला व्हेरियंट आधीसारखा धोकादायक नाही. आतापर्यंत, कोविडची लागण झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढलेले नाही. ज्या रुग्णांना आधीच कुठल्यातरी गंभीर आजाराने ग्रासले आहे, अशा रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घ्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed