बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय परिषद, डॉ. दयानंद जाधव यांनी सादर केला शोधप्रबंध
करवंदी, ता. उदगीर, येथील सध्या एम. जी. एम. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, नवी मुंबई येथे कार्यरत असलेले डॉ. दयानंद भाऊराव जाधव यांनी आय.सी. आय. एम. आय. ए. 2023 आंतरराष्ट्रीय परिषद दि. 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023 रोजी, दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, बंगळूरू येथे शोधनिबंध सादर केला . डॉ. दयानंद जाधव यांनी ‘ग्रीन सिन्थसिस ऑफ टिन ऑक्सईड पपया फॉर नॅनो इलेक्ट्रॉनिक्स अँप्लिकेशन्स ‘ या विषयावर संशोधन केले. या संशोधनाचा फायदा येणाऱ्या काळात, इलेक्ट्रिक वाहने व स्वयंचलित वाहनात वापरण्यात येणारे सेन्सर यासाठी होणार आहे. हे शोधकार्य त्यांनी भारतातील नामांकित आय. आय. टी. बॉम्बे या इन्स्टिटयूट मधून आय. एन. यू. पी. अंतर्गत पूर्ण केले. शोधकार्यात सहकारी म्हणून डॉ. दयानंद जाधव यांच्या पत्नी, फार्मासिस्ट नंदिनी जाधव व सी. ओ. ई. पी. पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. आर. डी. कोकाटे यांनी काम पहिले.