• Tue. Apr 29th, 2025

लातूर महानगरपालिकेत ८० पदांची भरती : ऑनलाईन अर्ज भरणा सुरू

Byjantaadmin

Dec 24, 2023

लातूर महानगरपालिकेत ८० पदांची भरती : ऑनलाईन अर्ज भरणा सुरू

संकेतस्थळावर माहिती उपलब्ध पारदर्शक पद्धतीने होणार प्रक्रिया …

    लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ, श्रेणी ब व श्रेणी क मधील रिक्त असणारी ८० पदे सरळसेवा प्रवेशाने भरली जाणार असून यासंदर्भात याबाबत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावरून माहिती घेऊन अर्ज भरणा करण्याचे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.सदर परिक्षेची संपुर्ण भरतीची प्रक्रिया ही टी.सी.एस. (TCS) या संस्थेमार्फत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार आहे.त्यामुळे उमेदवार किंवा त्यांच्या पालकांनी कुठल्याही अमिषाला बळी पडु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

   या भरतीसाठी शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०२३  रोजी सायंकाळी चार वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू झाली आहे.रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११:५९  पर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.दिनांक १४  जानेवारी रोजी रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येणार आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून परीक्षेच्या पूर्वी सात दिवस ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे. परीक्षेची तारीख,वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद करण्यात येईल.संभाव्य बदलाबाबत लातूर शहर महानगरपालिकेच्या www.mclatur.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाणार आहे.ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत,तपशील व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी या संकेतस्थळावर भेट द्यावी. संवर्गनिहाय भरावयाची पदेपदांचा तपशीलवेतनश्रेणीवयोमर्यादा निवडीची पद्धत, सर्वसाधारण सूचना,अटी व शर्ती,शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण,आरक्षणाबाबत तरतुदी,पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क व अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचा तपशील www.mclatur.org या संकेतस्थळावर उपलब्ध. करून देण्यात आला आहे पात्र उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी व भरतीसाठी अर्ज करावेत.भरतीची प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार आहे.भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed