• Tue. Apr 29th, 2025

सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते, रेणा साखर कारखाना येथे २,२१,१११ व्या साखर पोत्याचे पुजन संपन्न

Byjantaadmin

Dec 24, 2023

सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते, रेणा साखर कारखाना येथे २,२१,१११ व्या साखर पोत्याचे पुजन संपन्न

दिलीप नगर (निवाडा) :– ऊसऊत्पादक शेतक-यांच्या  जीवनात आर्थिक परिवर्तनाचे नवे पर्व सुरू करणा-या रेणा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ मधील उत्पादीत २,२१,१११ व्या (५०किलो)पोत्याचे पुजन रेणा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे,राज्य साखर संघाचे  माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख,रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषेराव हाके,सचिन दाताळ, संचालक सर्वश्री ,लालासाहेब चव्हाण, ,संजय हरिदास, संग्राम माटेकर,धनराज देशमुख, प्रेमनाथ आकणगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी,प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, अनिल कुटवाड तानाजी कांबळे, सौ वैशालीताई माने, सौ अमृताताई देशमुख, सतीश पाटील, स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने, कार्यकारी संचालक बी. व्ही.मोरे व खाते प्रमुख यांची उपस्थिती होती.
रेणा सहकारी साखर कारखान्याने लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे गाळप तत्परतेने करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील असून कारखान्याने अवघ्या 48 दिवसात दि.21/12/2023 रोजीपर्यंत 1,77,970 मे. टन. गाळप करत 9.42 %  प्रमाणे साखर उताऱ्यासह 1,57,800 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगामात रेणा साखर कारखान्याचे  दैनंदिन गाळप उत्तमरित्या सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed