लातूर शहरातील प्रभाग ५ मधील साडेचार कोटींची विकासकामे…कोणत्याही परिस्थितीत जनतेचा विश्वासास तडा जावू देणार नाही. विकासात्मक कामे करत राहिलो, करत राहणार
– माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची प्रतिक्रिया
लातूर/प्रतिनिधी: माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला. प्रभागातील नागरिकांनी निवडून दिल्यामुळेच वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या ऋणातून उतराई होणे शक्य नसले तरी प्रभागातील नागरिकांना अधिकाधिक सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यरत असून यापुढेही हे विकास कार्य असेच सुरू राहील, असे मत विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हे नगर कॉर्नर ते श्रीकृष्ण नगर चौक सिमेंट रस्ता तयार केला जाणार आहे. यासह श्रीकृष्ण नगर चौक ते हनुमान मंदिर सिमेंट रस्ता आणि राहुल नगर, बादाडे नगर,बस्तापुरे नगर येथे रस्ता व नाली बांधकाम केले जाणार आहे.गणेश मंदिर शेजारी सिमेंट रस्ता,कोल्हे नगर भागात तसेच मंठाळे नगर भागात रस्त्याचे काम होणार आहे.कोल्हे नगर, श्रीकृष्ण नगर या भागात नाली बांधकाम व गौसपुरा भागातील रस्त्याचे कामही या निधीतून केले जाणार असल्याची माहिती गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना दिली. प्रभागातील नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. पूजाताई पंचाक्षरी, डॉ. फरजाना बागवान, सुभाषअप्पा पंचाक्षरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद, माजी नगरसेवक सोमनाथ झुंजारे,काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष राम गोरड, यशपाल कांबळे, खाजामियां शेख, जयकुमार ढगे, इब्राहिम शेख बोरीकर, हमीद बागवान यांच्यासह, आकाश गायकवाड , धनराज कांबळे, डी उमाकांत, चव्हाण ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, माझ्यासारख्या तरुणाला आपल्या प्रभागाचा प्रतिनिधी म्हणून नागरिकांनी निवडून दिले. ज्या भावनेने नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या भावनेला तडा जाऊ नये असे काम करण्याचा प्रयत्न मी करत आहे. दरम्यानच्या काळात शहराचा महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रभागातील नागरिकांनी विश्वास ठेवून निवडून दिले नसते तर ही संधी मिळालीच नसती. महापौर म्हणून शहरात अनेक विकासकामे केली. राज्यात व देशात लातूरचा नावलौकिक वाढविणारी कामे करता आली याचे श्रेय प्रभागातील जनतेचे आहे. शहरातील कामे करताना प्रभागाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी त्या काळातही घेतली. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले, ज्या प्रभागातून आपण लोकप्रतिनिधी झालो त्या प्रभागाचा विकास करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कर्तव्य भावनेतूनच यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे गोजमगुंडे म्हणाले. यावेळी चेतन कोले,राम सूर्यवंशी,बालाजीराव माने, विशाल चामे,गजभार सर, आकाश गायकवाड, धनराज कांबळे,अमजद शेख,पडीले सर,मुस्तकीम पटेल,केदार सर,बालाजी केदार,अब्दुल्ला शेख, मनपा अधिकारी अकबर शेख,फिस्के,आशिष साठे, रवी शेंडगे,महादेव धावारे रहीम शेख आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.