मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे सिव्हिल मधील बाल रुग्णांना मोफत फळांचे वाटप
सोलापूर- श्री बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जुळे सोलापूर यांच्यातर्फे भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सर्वपचार रुग्णालय सोलापूर येथील बाल रुग्णांना मोफत विविध फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीना नदाफ , हाफिज सनाऊल्लाह शेख , जावेद भाई , लिपिक रेवाप्पा दसाडे सर ,प्राध्यापक शेख सर , प्राध्यापक हेडे सर, प्राध्यापिका माने मॅडम, ग्रंथपाल साळुंखे मॅडम, प्राध्यापिका जाधव मॅडम, मल्लिकार्जुन व बी.एड प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी , सिव्हिल मधील डॉक्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉ. समीना नदाफ म्हणाल्या 25 डिसेंबर 1924 साली तत्कालीन ग्वालियर संस्थानातील (आताच्या मध्यप्रदेश राज्यात आहे) एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. वाजपेयी यांचा जन्म झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. उदारमतवादी जागतिक दृष्टीकोन व लोकशाही तत्वांशी असलेली बांधिलकी यामुळे जनसामान्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो. महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले *श्री. अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छितात.*
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणजी ढोबळे, संस्थेचे अध्यक्ष कोमलताई साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.