युवती सेने तर्फे महिलांसाठी प्रशिक्षण
निलंगा:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवती सेना लातूर तर्फे हणमंतवाडी व निलंगा येथे बचतगटच्या महिलांना कायदे विषयी सल्ला, महिलांनी उद्योग कसे करावे, केंद्र व राज्य शासनाचा योजनाची माहिती व अंमलबजावणी यावर प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी
युवती जिल्हा प्रमुख ऍड.श्रद्धा जवळगेकर,युवती विस्तारक लातूर मनीषा वाघमारे, पूजाताई सगर शहर प्रमुख निलंगा आदी नी मार्गदर्शन केले.
महिलांनी स्वतः च्या हिमतीवर छोटे छोटे उद्योग सुरू करावे त्या साठी युवा सेना, युवती सेना, शिवसेना नेहेमी सोबत असेल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे महिलांना कायदे विषयी माहिती , शासन योजनाची माहिती , महिला सुरक्षा यावर प्रशिक्षण देण्यात आले यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.