नॅशनल बोर्ड ऑफ एक्सामिनेशन इन मेडिकल सायन्स (राष्ट्रीय परीक्षा मंडळ) घेणार डी फार्मसी ची एक्सिट एक्झाम
लातुर:-देशातील डी फार्मसी कोर्ससाठी सन 2022 -2023 पासून प्रवेश घेतलेल्या व सन 2023- 2024 पासून उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची देश पातळीवर एकच परीक्षा होणार आहे. संपूर्ण देशात डी फार्मसी करीता एकच अभ्यास क्रम फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे राबवला जात आहे. संपूर्ण देशभरात खुप मोठया संख्येने डी फार्मसी शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था स्थापन होत आहेत, या इन्स्टिटयूट मधून जे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी या पुढे एक्सिट exam उत्तीर्ण होने अनिवार्य आहे असे PCI नी सर्व इन्स्टिट्यूट व तसेच देश भारतील सर्व स्टेट फार्मसी कौन्सिल ला अमंलबजावणी करण्यासाठी दि 22 डिसेंबर 2023 च्या परिपत्रकानुसार कळविले आहे.
सदरील परीक्षा ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्सामिनेशन इन मेडिकल सायन्स, (राष्ट्रीय परीक्षा मंडळ) दिल्ली ही संस्था घेणार आहे. या बोर्डद्वारे मेडिकल च्या नीट, पी जी डिप्लोमा, एम डी, एम एस सारख्या परीक्षा घेतल्या जातात.या एक्सिट exam मुळे देश भारतील फार्मासिस्टची गुणवत्ता अधिक उत्तम राहवी व आरोग्य विभागातील टीम सक्षम होण्यासाठी खुप मदत होणार आहे. सर्व डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी सदरील परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सखोल अभ्यास करुन सामोरे जावे लागेल अशी माहिती महाराष्ट्र तंत्रनिकेतन डी फार्मसीचे प्राचार्य डॉ भागवत पौळ यांनी दिली आहे.