महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे लिंबाळा येथे उद्घाटन
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक विशेष शिबिराचे आयोजन मौजे लिंबाळा येथे करण्यात आले असुन त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन निलंगा तहसीलचे तहसीलदार मा. उषाकिरण यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटक म्हणून शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकीची भावना वृध्दिंगत करण्यासाठी महत्वाचे योगदान देत असते. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीगत जडणघडणीत जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा. ग्रामस्थांनीही शिबिराच्या माध्यमातून विकासात्मक कार्य करावे असे मत व्यक्त केले.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे रासेयो संचालक, डॉ. मल्लिकार्जुन करजगी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून ग्रामस्थांनी विकासकामांसोबतच बालविवाह निर्मुलन,अंधश्रद्धा निर्मुलन, डिजीटल साक्षरता यासारख्या विषयांकडेही लक्ष द्यावे. रासेयोचे शिबिर हे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य संवर्धनासाठी व श्रमसंस्कार रुजवण्यासाठीचे महत्वाचे व्यासपीठ आहे. यातुनच उद्याचे सक्षम नागरिक तयार होत असतात असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे ही गाव आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात समन्वय निर्माण करण्याचे करतात. विद्यार्थीजीवनात श्रम संस्कार आणि सामाजिक बांधीलकीची भावना निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून केले जाते. गावातील श्रमदान शिबिरातून जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे कार्य करत असताना ग्रामस्थांनी सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहनही केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच श्री सखाराम कलबोने आणि उपसरपंच श्री बालाजी माने यांनी भुमिका मांडली. या कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थीनी कमल गोमसाळे, सरस्वती लंगुटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रासेयो जिल्हा समन्वयक, डॉ. केशव अलगुले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर, डॉ. गोविंद शिवशेट्टे, ग्रामविकास अधिकारी व्ही. एन. मुक्तापुरे, मंडळ अधिकारी देशमुख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका सुवर्णा जाधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष पाटील, श्री प्रकाश पाटील, विजयकुमार चाकोते, श्री महेश डोणगापुरे, श्री अंगद सुर्यवंशी श्री धनंजय पाटील, श्री शिवाजी माने, श्री प्रकाश निला व गावातील प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रासेयोचे हे सात दिवसीय शिबिर २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होणार असुन यादरम्यान पशुतपासणी व रोगनिदान शिबिर, ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व विविध उद्बोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.