निलंगा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित नाईकवाडे यांचा अभय साळुंके यांच्या हस्ते सत्कार
निलंगा-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अजित नाईकवाडे यांची निवड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या नियुक्तीपत्राद्वारे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक श्रीहरी रुपवनर यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर निलंगा काँग्रेस कार्यालयमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव अभय साळुंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देताना अभय साळुंके म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजित नाईकवाडे हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन सक्रिय कार्य केले आहेत त्याच बरोबर नगर परिषद च्या माध्यमातून ही वॉर्ड प्रभाग येथे अनेक कामे केली आहेत .शहराध्यक्ष पदी त्याची निवड झाल्याने ते या पदाला संपूर्ण न्याय देऊन शहरात पक्षाचा विस्तार करतील अशी भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील ,प्रा.दयानंद चोपणे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील ,कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.