• Sun. Aug 10th, 2025

केरळमध्ये झपाट्याने वाढतोय करोनाचा नवा व्हेरिंएट JN.1; दिल्लीत ही रुग्ण आढळले

Byjantaadmin

Dec 20, 2023

नवी दिल्ली: करोना व्हायरसचा नवा व्हेरिंएट JN.1चे भारतातील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या व्हेरिंएटचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये सापडले आहेत. गेल्या २४ तासात केरळमध्ये २९२ रुग्ण सापडले आहेत. तर राजधानी नवी दिल्लीत ४ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात ३०८ नवे रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकरणी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी बैठक घेतली आहे.

Corona

 

केरळमध्ये JN.1 या नव्या व्हेरिंएटचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात २९२ नवे रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झालाय. देशाची राजधानी नवी दिल्लीत देखील नव्या व्हेरिंएटचे रुग्ण सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्लीत करोनाचे दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या २४ तासात राजधानीत ३ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ इतकी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. ज्यांना श्वास घेण्यास अडचणी आहेत त्या सर्वांनी काळजी घ्यावी असे बैठकीत सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *