• Sun. Aug 10th, 2025

भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसाचा टोकाचा निर्णय, पुण्यात रेल्वेखाली आयुष्य संपवलं

Byjantaadmin

Dec 20, 2023

पुणे : भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचं कारण आद्यप कळू शकलेलं नाही. ज्याठिकाणी आत्महत्या केली आहे तिथे कोणतीही सुसाईड नोट अथवा चिट्टी आढळून आलेली नाही. हा सगळा प्रकार काल मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे.

Pune BJP Yuva Morcha President Sunil Dhumal Ended his Life

या प्रकरणी पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील मधुकर धुमाळ (वय ३५, रा. साडेतरानळी, हडपसर, पुणे) असे आत्महत्या केलेले भाजपा सरचिटणीसचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हडपसर रेल्वे मार्गावर एक मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुनील धुमाळ असं त्या व्यक्तीच नाव होतं. प्राथमिक माहितीनुसार, सुनील यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुनील धुमाळ हे भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस या पदावर काम करत होते. एक अॅक्टिव्ह नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. याचा पुढील तपास हडपसर पोलीस आणि रेल्वे मार्ग पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *