शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रात लिहलेल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. दरम्यान संजय राऊत यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप वगळला आहे.सामना वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कायदेशीर मत मागवल्यानंतर आणि सल्लामसलत केल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यावरील देशद्रोहाचा आरोप वगळला आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पोलिसांनी कलम 153 (0),505(2), 124 (अ) गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यात 124 अ हे कलम देशद्राहाच्या गुन्ह्यासाठी लावण्यात आले होते. या प्रकरणी भाजपचे जिल्हा समन्वय नितीन सुरेशचंद्र भुतडा यांनी तक्रार दिली होती.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी या संदर्भात निर्णय दिले आहेत आणि सरकारी वकिलांशी सल्लामसलत केल्यानंतर पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप वगळण्याचा हा निर्णय घेतला, मात्र या प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.