• Mon. Aug 11th, 2025

450 रुपयांपेक्षा स्वस्त LPG सिलेंडर? राजस्थानात घोषणा अन् संसदेत इन्कार.. भाजपचा युटर्न

Byjantaadmin

Dec 19, 2023

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, सरकारने राज्यसभेत सांगितले की, राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचा कोणताही विचार नाही. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली.राज्यसभा खासदार जावेद अली खान यांनी सरकारला विचारले की, सरकारने अलीकडेच राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे का? केंद्र सरकार उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचा विचार करत आहे का, असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला.

दोन्ही प्रश्नांची लेखी उत्तरे देताना, पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी सांगितले की, अशी कोणतीही घोषणा केली नाही. भारत सरकारकडून राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

नुकत्याच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा झाल्या आहेत. राजस्थानमधील केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांमध्ये सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते.मध्य प्रदेशातही भाजपने आपल्या जाहीरनाम्यात 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. आणि या दोन राज्यांव्यतिरिक्त छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यात यश आले आहे.या तीन राज्यांमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून राजस्थान आणि मध्य प्रदेशसह संपूर्ण देशात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *